क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले १२७ वा स्मृतिदिन निमित्ताने


                आपल्या देशात प्रबोधनाची व परिवर्तनाची चळवळ १९ व्या शतकात सुरु झाली. प्रारंभीच्या सुधारकांनी सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक जीवनात सुधारणा घडवून आणण्याबाबतचे विचार मांडले. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्र फुले दांपत्याने सुधारण्यांच्या विचारांना गतिशील कृतिशीलतेची जोड देऊन परिवर्तनाची चळवळी शक्तीमान केली. समाजातील दीन दलित उपेक्षित लोकांच्या उध्दारासाठी फुले दांपत्यांनी आयुष्यभर सर्वस्याला लावून प्रयत्नांची पराकाष्ठा केली, फुले दांपत्याच्या कार्याने महाराष्ट्रातील सामाजिक जीवनात नव्या युगाचा प्रारंभ झाला. फुले दांपत्यांच्या या सामाजिक परिवर्तनाच्या कार्यापासून पुढील काळात अनेकांना  स्फूर्ती व प्रेरणा मिळाली आहे.

महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासावर ज्या मोजक्या स्त्रियांनी आपल्या अव्दितीय कर्तृत्वाचे कायम स्वरूपी उसा उमटविला, त्यामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अग्रणी होत्या. सावित्रीबाईंना विशेष अनुकूल पूर्व पिठीका लाभली नसतानाही त्यांनी आपले पति महात्मा जोतिबा फुले यांच्या समाज परिवर्तन विषयी विचारांपासून व कार्यापासून प्रेरणा घेऊन त्यांच्या खांद्याला खांदा लावून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उपेक्षित वर्गाच्या कल्याणासाठी अतुलनीय कामगिरी केली. १९९७ हे वर्ष महाराष्ट्रभर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मृतिशताब्दी समिती सातारा या समितीने शताब्दी वर्षानिमित्ताने केलेल्या कार्याचा परिचय तसेच महात्मा फुले विचार अभियान या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती  करून देणारा हा प्रयत्न.

           सावित्रीबाईचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव तालुका खंडाळा, येथे ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. त्यांचे वडील खंडोजी शिदोजी नेवसे, नायगांवचे पाटील होते. तत्कालिन प्रथेनुसार वयाच्या ९ व्या वीं १८४० मध्ये सावित्रीबाईंचा विवाह जोतिबा गोविदराव फुले यांच्याशी झाला. विवाहापूर्वी सावित्रीबाई अक्षरशत्रु होत्या. जोतीबांनी त्यांना लिहणे, वाचणे शिकविले. सावित्रीबाई मुळातच जिज्ञासू व हुशार होत्या. त्यांची ज्ञानलालसा उद्य प्रतिची होती. एका पाठोपाठ धडे आत्मसात करून त्यांनी १८४८ मध्ये शिक्षिकी पेशाचे प्रशिक्षण पूर्ण केले. १८४८ मध्ये शिक्षीकी पेशाचे प्रशिक्षण पूर्ण केले. १९४८ पासून पुणे येथे सुरू केलेल्या मुलींच्या शाळेत त्यांनी प्रारंभी शिक्षिका नंतर मुख्याध्यापिका व शेवटी निरिक्षक म्हणून विनावेतन सेवा केली, ज्या काळात शिक्षण घेणे वरिष्ठ वर्गीय पुरूषांची मक्तेदारी होती. स्त्रियांनी शिकणे हे धर्मविरोधी व अनितीचे मानले जात होते. त्या काळात सावित्रीबाईसारख्या कनिष्ठ स्त्री वर्गातील स्त्रीने शिक्षण घेऊन मुर्तीच्या शाळेत शिकविण्याचे काम करणे हे कृत्य धाडसाचे व क्रांतिकारक असेच होते. सवित्रीबाई या आपल्या देशातील पहिल्या प्रशिक्षीका होत्या.

             सावित्रीबाईनी मानवतेच्या भावनेने फसलेल्या किंवा फसविल्या गेलेल्या तरूण विधवांच्या सहाय्यार्थ आपल्या घरी बालहत्सा प्रतिबंधक गृहाची स्थापना करून अनेक निष्पाप अर्भकांचे प्राण वाचविले. विधवांचे केशवपन करण्याची दृष्टप्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न केला. देवाधर्माच्या नांवावर समाजामध्ये व्यभिचार व अनिती पसरवून स्त्रीयांचे जीवन कवडीमोल करणारी देवदासींची अनिष्ठ प्रथा बंद करण्यात पुढाकार घेतला. दिनदलीत व निराधार स्त्रीयांना स्वावलंबी जीवन जगता यावे म्हणून त्यांनी अशा स्त्रियांसाठी अनेक छोटे उद्योग व्यवसाय सुरू केले. विधवा स्त्रीयांचे पुर्नविवाह घडवून आणण्यात फुले दांपत्याने पुढाकार घेतला. स्त्री शक्ती जागृत केल्याशिवाय स्त्री मुक्ती शक्य आहे है सावित्रीबाईंनी दाखवून दिले, महाराष्ट्रात १८७६-७७ व १८८९-९७ या वर्षी दुष्काळ पडला असता दुष्काळ पिडीतांना सहाय्यार्थ अन्नछत्रे चालविली व प्लेग निवारणासाठी बहुमोल कार्य केले.

                 सावित्रीबाईंनी सामाजिक कार्याबरोबरच साहित्य निर्मिती केली. त्या युध्दिमान लेखिका व प्रतिभासंपन्न कवियत्री होत्या. समाज प्रबोधनाचे विचार त्यांनी खालील साहित्य कृतितून मांडले आहेत. त्यांचे काव्य फुले १८५४ बावनकशी सुबोध रत्नाकर १८९२ हे काव्य संग्रह मातोश्री सावित्री बाईंची भाषणे व गाणी आणि ज्योतिबांची भाषणे हे साहित्य प्रबोधन चळवळीचे दीपस्तंभ आहेत.

अशा थोर आणि आदर्श समाज सेविकेचे निधन १० मार्च १८९७ रोजी झाले. त्याला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने त्यांचे पुण्यस्मरण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.

सातारा जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मृति शताब्दी समितीने शताब्दी वर्षात पुढील विविध उपक्रम राबविले. १० मार्च १९९६ रोजी सावित्रीबाईंच्या जन्मगावी नायगांव येथे क्रांतिध्वज उभारून कार्यक्रमाची सुरूवात व चिरकाल टिकणारा तांब्रध्वज अनावरण महाराष्ट्रात १०० ठिकाणी सावित्रीबाईच्या जीवनकार्याची ओळख करून देणारी व्याखाने आयोजित केली. अंधश्रध्दा निर्मुलनासाठी विविध ठिकाणी व्याख्याने व प्रात्यक्षिके शिक्षण प्रसारासाठी प्रबोधन, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेत सहभागी होण्यासाठी अनेकांना प्रोत्साहन, ग्रामपंचायत, पंचायत समिती व नगर परिषदांमध्ये निवडून आलेल्या महिला प्रतिनिधींच्या खऱ्या अर्थाने निःस्पृह वृत्तीने कार्य केल्याबद्दल अशा १०० समाजसेविका महिलांचा सत्कार करून योग्य प्रकारे कामकाज करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन, सावित्रीबाई फुले संदेशयात्रा, सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची ओळख करून देणाऱ्या पुस्तकांचे मोफत वाटप, सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती देणारे आठआई, जागर, ही सावित्री इत्यादी अंकाचे प्रकाशन, १०० दिव्यांचे प्रज्वलन करून सावित्रीबाईंच्या पवित्र स्मृतिस आदरांजली इत्यादी उपक्रम राबविताना अनेक मान्यवरांचे तसेच फुले प्रेमींचे बहुमोल सहकार्य लाभले. या सर्व उपक्रमांची सांगता दिनांक १० मार्च, १९९८ रोजी महात्मा फुले यांची कुलभूमी असलेल्या कटगुण गावी फुले प्रेमींच्या उपस्थितीत करण्यात आले.

         



Comments