नायगावांत 'क्रांतिज्योती'काव्य संग्रह पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न
काव्य संग्रहात महाराष्ट्रातील एकूण १०९ कवींच्या कवितांचा सहभाग
खंडाळा -नायगांव ता.खंडाळा येथे "क्रांतिज्योती" या काव्यसंग्रह पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांचे शतकोत्तर रौप्यमहोत्सव स्मृती वर्ष साजरे होत आहे. सावित्रीमाईच्या प्रत्येक पैलूंचा अभ्यासपूर्वक प्रसार होत आहे.त्यांच्या लेखन ,कविता व साहित्यिक पैलू फारसा समाजासमोर आलेला नाही.या १२५ स्मृतिदिनानिमित्त एक आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण करण्याचा मानस व्यक्त केला. यासाठी सुजन फौंडेशनच्या वतीने सावित्रीबाई फुले या विषयावर काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन केले.राज्यभरातून एकशे नऊ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगाव नायगाव येथे क्रांतिज्योती संपादित काव्यसंग्रह प्रकाशन करून या कवितातूनच सावित्रीबाई फुले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
हा कार्यक्रम संपन्न होत असताना नायगांवच्या सरपंच पूनम राजेंद्र नेवसे,राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या राज्य समन्वयक दिपालीताई पांढरे, महात्मा फुले समता परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा मंजिरीताई धाडगे,सावित्रीबाई फुले स्मृती शताब्दी समितीच्या अध्यक्षा सुनंदा जाधव, युवा माळी संघटनेच्या सुनीता भगत,समता परिषदेच्या पुणे शहराध्यक्षा गौरी पिंगळे, पिंपरी चिंचवडच्या सामाजिक कार्यकर्त्या रोहिणी रासकर खंडाळा पंचायत समितीच्या माजी सभापती शुभांगी नेवसे,नायगांव ग्रामपंचायत सदस्य साधना नेवसे,वैशाली नेवसे माजी ग्रामपंचायत सदस्य ,सीमा एकतपुरे, दैनिक तरुण भारतचे सातारा उपसंपादक सुधीर जाधव, पल्लवी मारकड, मीनल कुडाळकर, मंदाकिनी सपकाळ तासगाव,संदीप ननावरे, सुनील रासकर, किशोर ननावरे, सुभाष गोवेकर, गणेश भोसले, रुपाली नेवसे, जयश्री जमदाडे ,सुवर्णा पळशीकर , सुप्रिया नेवसे, मंगल कुंभार, मंदाकिनी नेवसे आदी उपस्थित होते.यावेळी काव्यसंमेलन संपन्न होत असताना या काव्य संमेलनाचे अध्यक्षपद कवि किशोर धरपडे यांनी भूषविले.तसेच विजेते कवी यांचा बक्षीस वितरण कार्यक्रम ही संपन्न करण्यात आला.
मी ल. खं. चौधरी गुरुजी सुरत.
ReplyDeleteभारतात सर्वप्रथम महिलांना शिक्षणाची सोय, स्वतः सावित्रीबाई फुले जी, फातिमा शेख जी, सगुणाबाई क्षीरसागर यांनी करून दिली. त्याचबरोबर ज्या मुली तसेच त्यांचे पालक शिक्षण कार्यास तयार झाले होते! त्यांना ही विनम्र अभिवादन.
आज सुजाण फाऊंडेशनचे संस्थापक संचालकांनी माई सावित्रीबाई फुले जीं च्या अलौकिक,अद्वितीय,असामान्य कर्तृत्वाची अस्मिता आणि अप्रतिम शान, १२५ व्यावर्ष
निमित्त "कविता" संग्रह ,जाहीर सामाजिक माध्यमातून कविता मागवून कविता संग्रह प्रसिद्ध केला! त्याबद्दल सर्व सहकारी बंधू भगिनीं आणि संपादन करणारे महानुभव या सर्वांना अंतःकरणापासून हार्दिक शुभेच्छा स्वीकाराव्या.महात्मा फुलेजी आणि माई सावित्रीबाई फुले जीं चे चिरस्मरणीय कार्य पृथ्वीतलावर चिरंजीव राहील. महान विभूतींना नतमस्तक नमन.जय ज्योती जय क्रांती.
८/३/२०२२ जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा स्वीकाराव्या.
असे पुस्तक प्रकाशन सोहळे वारंवार व्हायला हवेत....संपादनाचे काम करणाऱ्या रासकर मॅडम, जाधव सर आणि ज तू गार्डे सर यांचे विशेष करून अभिनंदन तसेच या काव्य प्रकाशनासाठी स्वरचित कविता लिहिणाऱ्या सर्वांचेच खूप खूप अभिनंदन.....
ReplyDelete