भारतीय
स्वातंत्र्य संग्रामातील गौरवशाली पर्व म्हणजे आझाद हिंद सेना व सातारा
प्रतिसरकार यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सुजन फौंडेशन यांच्या
क्रांतीअभियान या विशेष उपक्रमा अंतर्गत स्वातंत्र्य चळवळीला
उजाळा,हुतात्म्यांना अभिवादन, क्रांतिकार्य उजाळा,राष्ट्रीय एकात्मता,
विद्यार्थी गौरव, सामाजिक समस्या व उपाय योजना बाबत जनजागृती, व्याख्यान ,
निबंध स्पर्धा , थोर महापुरुषांच्या, देशभक्ताच्या व स्वातंत्र्य सैनिक
यांच्या क्रांतिकारी आठवणींना उजाळा व समाजहित व देशहिताच्या कार्य
करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांची ओळख व कौतुक समारंभ अशा विविध उपक्रमांनी
अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहोत.
राज्यस्तरीय
खुल्या निबंध स्पर्धेचे विषय खालील प्रमाणे असे आहेत.भारतीय स्वातंत्र्य
लढा व सातारा प्रतिसरकार, भारतीय स्वातंत्र्य लढा व आझाद हिंद सेना,
क्रांतिसिंह नाना पाटील व शेतकरी,कामगार चळवळ , नेताजी सुभाषचंद्र बोस
स्वातंत्र्य क्रांतीपर्व, स्वच्छ भारत माझे योगदान, स्वदेशी चळवळ आजची गरज,
सेंद्रिय शेती काळाची गरज, जलसंधारण काळाची गरज .
सदर निबंध स्पर्धा ही
विद्यार्थी, पालक, शिक्षक , व सर्वा करिता खुली राहील.निबंध ठरवून दिलेल्या
कोणत्याही एका विषयावर असावा.निबंध हा कागदाच्या एकाच पृष्ठभागावर सुवाच्य
अक्षरात सातशे ते आठशे शब्दांपेक्षा जास्त नसावा. निबंधासोबत आपलं संपूर्ण
नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर,इमेल,व्हाट्स अप नंबर असावा.
स्पर्धा प्रवेश विनामूल्य राहिल ,महाराष्ट्राच्या प्रादेशिक विभागातून
प्रत्येकी तीन विजेते निवडले जातील, बक्षीसाचे स्वरूप रोख रक्कम ,गौरव
चिन्ह व प्रमाणपत्र असे राहील .सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले
जाईल.स्पर्धकांनी आपले निबंध अध्यक्ष सुजन फौंडेशन मु पो आदरकी बु. ता
फलटण जि सातारा ४१५५३७ या पत्त्यावर पोस्टाने पाठविण्याची अंतिम तारीख २७
फेब्रुवारी २०१९ आहे. सदर स्पर्धेमध्ये बहुसंख्येने सहभागी व्हावे असे
आवाहन समन्वयक अजित जाधव यांनी केले.
संपर्क
मोबाइल ९५७९३४४१७७
Comments
Post a Comment